Skip to content
नीतिसूत्रे १४:१५-१९

नीतिसूत्रे १४:१५-१९

१५
साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात. परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो.
१६
सुज्ञ मनुष्य याहवेहचे भय बाळगतो आणि वाईटापासून दूर राहतो. परंतु मूर्ख तापट डोक्याचा आहे आणि तरीही त्याला सुरक्षित वाटते.
१७
तापट मनुष्य मूर्खपणाच्या गोष्टी करतो, आणि दुष्टसंकल्पांची योजना करणाऱ्याचा तिरस्कार केला जाईल.
१८
साध्याभोळ्याला मूर्खपणाचा वारसा मिळतो, तर सुज्ञाला सुज्ञतेचा मुकुट मिळतो.
१९
दुष्ट माणसे चांगल्या माणसांसमोर, आणि पापी माणसे नीतिमानांच्या द्वारासमोर शरणागती पत्करतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options