मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे १२:१५-२३

सत्य व विवेकाची शक्ती

नीतिसूत्रे १२:१५-२३
१५
मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो; परंतु जो शहाणा असतो, तो सल्ला ऐकतो.
१६
मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो, परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
१७
प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो, परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो.
१८
निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो, पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते.
१९
सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते; लबाड जिव्हा ही क्षणिक आहे.
२०
दुष्ट योजना करणार्‍यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्‍यांच्या हृदयात आनंद असतो.
२१
न्यायी मनुष्यावर काहीही आपत्ती येणार नाही, परंतु दुष्ट लोक आपत्तींनी व्याप्त होतात.
२२
असत्य बोलणार्‍या ओठांची याहवेह घृणा करतात, परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात.
२३
सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही, परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options