Skip to content
नीतिसूत्रे १२:८-१४

नीतिसूत्रे १२:८-१४

मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते, परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो.
स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे.
१०
नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या गरजांची काळजी घेतो, परंतु दुष्ट लोकांच्या अत्यंत दयेची कार्येही क्रूर असतात.
११
जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात, तो अक्कलशून्य असतात.
१२
दुष्ट मनुष्य दुर्जनांच्या लुटीची इच्छा करतो, परंतु नीतिमानाचे मूळ टिकून राहते.
१३
दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात, आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो.
१४
ओठांच्या फळांनी मनुष्याला उत्तम गोष्टी लाभतात, आणि हाताने केलेले परिश्रम त्यांना बक्षीस मिळवून देतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options