परिश्रम, चिंता व जीवनाचा मार्ग
२४
उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील, पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल.
२५
चिंता हृदयावर दबाव आणते, परंतु कोमल शब्द ते आनंदित करते.
२६
नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो.
२७
आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही, परंतु उद्योगी मनुष्याला भरपूर मिळकत प्राप्त होते.
२८
नीतिमानाचा मार्ग जीवनाकडे जातो, व त्याच मार्गामधून अमरत्व मिळते.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.