मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे १०:१५-२१

संपत्ती, परिश्रम व टिकाऊ सुरक्षितता

नीतिसूत्रे १०:१५-२१
१५
धनवानाचे धन हे त्यांचे तटबंदीचे नगर आहे, दारिद्र्य गरिबाचा नाश आहे.
१६
नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे, परंतु दुष्ट मनुष्याचे कमाई पाप आणि मृत्यू हेच आहेत.
१७
जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्‍यांची दिशाभूल करतो.
१८
जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय.
१९
शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो; पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात.
२०
नीतिमान मनुष्याची जिव्हा उत्तम चांदीप्रमाणे असते; परंतु दुष्टाच्या अंतःकरणास क्षुल्लक किंमत असते.
२१
नीतिमान मनुष्याचे ओठ अनेकांचे पोषण करतात; परंतु मूर्ख लोक विवेकाच्या अभावी नाश पावतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options