Skip to content
फिलेमोन १:१८-२५

फिलेमोन १:१८-२५

१८
जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड.
१९
हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही.
२०
बंधू, माझी इच्छा आहे की प्रभूमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या ह्रदयाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर.
२१
तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे.
२२
आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो.
२३
ख्रिस्त येशूंमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास तुला शुभेच्छा पाठवितो.
२४
आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात.
२५
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासह असो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options