अदोमाविरुद्ध न्याय घोषित
ओबद्याह १:१-४
१
ओबद्याहचा दृष्टान्त हा. एदोमाबद्दल सार्वभौम याहवेह असे म्हणतात; आम्ही याहवेहकडून हा संदेश ऐकला: राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठविण्यात आला होता, “उठा, आपण तिच्याविरुद्ध युद्ध करण्यास जाऊ.”
२
“पाहा, राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन; तुझा पूर्णपणे तिरस्कार करण्यात येईल.
३
तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता आणि तुमचे घर उंचावर बांधता, तुम्ही जे स्वतःला म्हणता, ‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’
४
तू गरुडांप्रमाणे उंच भरार्या मारीत असलास किंवा आपले घरटे तार्यांमध्ये बांधत असलास, तरी तिथून मी तुला खाली आणेन,” असे याहवेह जाहीर करतात.
Settings