Skip to content
आमोस ९:११-१५

आमोस ९:११-१५

११
“त्या दिवशी “दावीदाचा पतन झालेला आश्रय मी पुनर्स्थापित करेन; मी तिची तुटलेली तटबंदी दुरुस्त करेन, आणि तिचे अवशेष दुरुस्त करेन— आणि पूर्वीसारखीच तिची पुनर्बांधणी करेन,
१२
यासाठी की त्यांनी एदोमच्या अवशेषांवर व माझे नाव धारण करणार्‍या सर्व राष्ट्रांचा ताबा घ्यावा,” ही कार्ये करणारे याहवेह ही घोषणा करतात.
१३
“ते दिवस येत आहेत,” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा नांगरणारा कापणी करणार्‍याला आणि द्राक्षे तुडविणारा बी पेरणार्‍याला मागे टाकेल. नवीन द्राक्षारस पर्वतांवरून गळू लागेल आणि ते सर्व टेकड्यांवरून वाहू लागेल,
१४
मी माझ्या इस्राएली लोकांना बंदिवासातून परत आणेन. “ते त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या नगरांची पुनर्बांधणी करून त्यात राहतील. ते द्राक्षमळे लावतील आणि त्याचा द्राक्षारस पितील; ते बागा लावतील आणि त्याची फळे खातील.
१५
मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या भूमीमध्ये पेरीन, मी त्यांना दिलेल्या भूमीतून त्यांना पुन्हा उपटून टाकण्यात येणार नाही.” असे याहवेह तुमचे परमेश्वर म्हणतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options