गणना ३१:१५-१८
१५
मोशेने त्यांना विचारले, “तुम्ही सर्व स्त्रियांना जिवंत राहू दिले काय?
१६
त्यांनीच बलामाच्या सल्ल्यानुसार पेओरच्या प्रकरणात इस्राएली लोकांना याहवेहशी अविश्वासूपणा करण्यास भाग पाडले आणि याहवेहच्या लोकांना पीडेने मारले.
१७
तर आता सर्व मुलांस जिवे मारा व पुरुषाशी संग ठेवलेल्या प्रत्येक स्त्रीला मारून टाका,
१८
परंतु जिचा कधीही पुरुषाशी संग झाला नाही ती प्रत्येक मुलगी तुमच्यासाठी राखून ठेवा.
Settings