Skip to content
गणना १९:११-१६

गणना १९:११-१६

११
“जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे.
१२
त्यांनी तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी स्वतःला पाण्याने शुद्ध करावे; मग ते शुद्ध होतील. पण तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते अशुद्धच असतील.
१३
मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो.
१४
“एखादा मनुष्य जेव्हा तंबूमध्ये मरण पावतो त्यावेळी पाळावयाचा नियम हा: जो कोणी त्या तंबूमध्ये प्रवेश करतो आणि जो कोणी तंबूत आहे त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे,
१५
आणि दोरीने झाकण न बांधलेले प्रत्येक उघडे पात्र अशुद्ध असावे.
१६
“जो कोणी मोकळ्या मैदानात तलवारीने मारलेल्या व्यक्तीच्या शवाला स्पर्श करतो किंवा कोणी नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला किंवा कोणी मानवी हाडाला किंवा कबरेला स्पर्श करतो, त्याने सात दिवस अशुद्ध राहावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options