Skip to content
नहेम्याह ४:६

नहेम्याह ४:६

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ६ दाखवत आहे.
३
तोबीयाह अम्मोनी त्याच्या जवळच उभा होता. तो बोलला, “काय तरी यांचे बांधकाम—एखादा कोल्हा जरी यांच्या त्या तटावरून चालत गेला तरी तो दगडी तट कोसळेल!”
४
आमच्या परमेश्वरा, आमचे ऐका, कारण आमचा उपहास होत आहे. त्यांची थट्टा त्यांच्याच शिरी उलटो आणि एखाद्या परकीय देशात बंदिवान म्हणून त्यांची लूट होऊ द्या.
५
त्यांच्या अपराधांकडे डोळेझाक करू नका; त्यांचे पाप पुसून टाकू नका, कारण बांधणार्‍यांना त्यांनी अपमानित केले आहे.
६
शेवटी मूळ उंचीच्या अर्ध्या उंचीपर्यंतचा तट पूर्ण झाला, कारण लोकांनी अगदी मन लावून काम केले होते.
७
पण सनबल्लट, तोबीयाह अरबी, अम्मोनी व अश्दोदी यांनी ऐकले की यरुशलेमच्या तटाचे काम झपाट्याने पुढे चालले आहे आणि तटाची खिंडारे बुजू लागलेली आहेत, तेव्हा ते अतिशय संतप्त झाले.
८
त्यांनी यरुशलेममध्ये दंगे व गोंधळ निर्माण करण्याचा कट केला.
९
पण आम्ही आमच्या परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपले संरक्षण करण्यासाठी शहरावर रात्रंदिवस पहारा ठेवला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options