नहूम ३:१-७
१
हे रक्तपात करणाऱ्या नगरी, तुला धिक्कार असो, लबाड्यांनी गच्च भरलेली, लूटमाऱ्यांनी भरलेली, कधीही पीडितांशिवाय नसणारी!
२
चाबकांच्या फटकार्यांचा आवाज, चाकांचा खडखडाट, चौखूर धावणारे घोडे आणि हिसके देणारे रथ!
३
आक्रमक घोडेस्वारांची पलटण लखलखणार्या तलवारी चमचमणारे भाले! पडलेली अनेक प्रेते, सर्वत्र मृतांचे ढीग, अगणित मृत शरीरे, प्रेतांना अडखळून पडणारे लोक—
४
या सर्वांचे कारण, एका वेश्येच्या रंगेलपणाची वासना, ती भुलविणारी, जादूटोण्याची स्वामिनी आहे, तिने आपल्या वेश्यागिरीने राष्ट्रांना आणि जादूटोण्याने लोकांना गुलाम बनविले.
५
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “मी तुझ्याविरुद्ध आहे, मी तुझे वस्त्र तुझ्या चेहऱ्यावर उचलेन. तुझी नग्नता सर्व राष्ट्रांना आणि तुझी लज्जा सर्व देशांना दाखवेन.
६
मी तुझ्यावर घृणास्पद गोष्टी फेकेन, मी तुला अपमानित करेन आणि तुला तमाशा बनवेन.
७
तुला पाहणारे सर्व भयभीत होऊन तुझ्यापासून दूर पळतील व म्हणतील, ‘निनवेह उद्ध्वस्त झाली आहे—तिच्यासाठी कोण शोक करेल?’ तुझे सांत्वन करणारा मला कुठे मिळेल?”
Settings