मुख्य मजकुरावर जा
नहूम ३:१-४

रक्तपात करणाऱ्या नगराला धिक्कार

नहूम ३:१-४
हे रक्तपात करणाऱ्या नगरी, तुला धिक्कार असो, लबाड्यांनी गच्च भरलेली, लूटमाऱ्यांनी भरलेली, कधीही पीडितांशिवाय नसणारी!
चाबकांच्या फटकार्‍यांचा आवाज, चाकांचा खडखडाट, चौखूर धावणारे घोडे आणि हिसके देणारे रथ!
आक्रमक घोडेस्वारांची पलटण लखलखणार्‍या तलवारी चमचमणारे भाले! पडलेली अनेक प्रेते, सर्वत्र मृतांचे ढीग, अगणित मृत शरीरे, प्रेतांना अडखळून पडणारे लोक—
या सर्वांचे कारण, एका वेश्येच्या रंगेलपणाची वासना, ती भुलविणारी, जादूटोण्याची स्वामिनी आहे, तिने आपल्या वेश्यागिरीने राष्ट्रांना आणि जादूटोण्याने लोकांना गुलाम बनविले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options