मुख्य मजकुरावर जा
मीखाह ५:१०-१५

परमेश्वर इस्राएलाला शुद्ध करतो आणि राष्ट्रांचा न्याय करतो

मीखाह ५:१०-१५
१०
“त्या दिवशी,” याहवेह ही घोषणा करतात, “मी तुमच्या घोड्यांचा तुमच्यामध्ये नाश करेन आणि तुमच्या रथांनाही नष्ट करेन.
११
मी तुझ्या देशातील शहरांचा नाश करेन आणि तुझे किल्ले उद्ध्वस्त करेन.
१२
मी तुमच्यातील चेटके नष्ट करेन आणि यापुढे तुझ्यामध्ये कोणीही शकुन पाहणार नाही.
१३
मी तुमच्या मूर्ती आणि तुमच्यातील पवित्र दगडांचा नाश करेन; तुमच्या हस्तकृतींना तुम्ही पुन्हा दंडवत करणार नाही.
१४
जेव्हा मी तुझी नगरे उद्ध्वस्त करेन, तेव्हा तुझे अशेरा स्तंभ उपटून टाकीन.
१५
ज्या राष्ट्रांनी माझी आज्ञा पाळली नाही, त्यांचा मी रागाने आणि क्रोधाने सूड उगवेन.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options