Skip to content
मत्तय ५:३३-३७

श्रेष्ठ निकष: शपथा

मत्तय ५:३३-३७
३३
“प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘शपथ मोडू नका, तर प्रभूला वाहिलेली प्रत्येक शपथ पूर्ण करा.’
३४
परंतु मी तुम्हाला सांगतो, शपथ वाहू नका. स्वर्गाची नव्हे, कारण ते परमेश्वराचे सिंहासन आहे.
३५
किंवा पृथ्वीची, कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे,
३६
आणि स्वतःच्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तुम्हाला एक केसही पांढरा किंवा काळा करता येत नाही.
३७
जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे ‘होय’ किंवा ‘नाही’ असावे; यापेक्षा अधिक त्या दुष्टापासून येते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options