मत्तय २७:२६-३५
२६
तेव्हा पिलाताने बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता सैनिकांच्या स्वाधीन केले.
२७
मग राज्यपालाच्या शिपायांनी येशूंना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना राजवाड्यात प्राइतोरियम येथे नेऊन सर्व सैनिकांच्या टोळीला तिथे एकत्र बोलाविले
२८
तिथे त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि त्यांना किरमिजी रंगाचा झगा घातला.
२९
मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”
३०
ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले.
३१
येशूंची अशी थट्टा केल्यावर त्यांनी झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता घेऊन गेले.
३२
ते त्यांना घेऊन क्रूसावर खिळण्याच्या जागेकडे निघाले. वाटेत त्यांना कुरेने गावचा शिमोन नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.
३३
मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा”.
३४
त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही.
३५
येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings