Ir al contenido
मत्तय २३:२९-३६

मत्तय २३:२९-३६

२९
“अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो. तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमानांच्या कबरा सजविता
३०
तुम्ही म्हणता, ‘आम्ही आमच्या वाडवडीलांच्या काळात राहत असतो, तर संदेष्ट्यांचे रक्त सांडण्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर कधीही भाग घेतला नसता.’
३१
पण असे बोलताना, तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता की तुम्ही संदेष्ट्यांचे खून करणार्‍या वाडवडीलांची संताने आहात.
३२
मग जा आणि ज्याचा तुमच्या पूर्वजांनी आरंभ केला होता ते पूर्ण करा.
३३
“अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल?
३४
यास्तव मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी आणि शिक्षक पाठवित आहे. काहींचा तुम्ही वध कराल आणि क्रूसावर द्याल; काहींना सभागृहात फटके माराल आणि नगरोनगरी त्यांच्या पाठीस लागाल.
३५
नीतिमान हाबेलाच्या रक्तापासून मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये ज्याचा वध तुम्ही केला तो बरख्याचा पुत्र जखर्‍याहच्या रक्तापर्यंत, जे सर्व नीतिमान रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले त्याचा दोष तुम्हावर येईल.
३६
मी तुम्हाला सत्य सांगतो की, तो याच पिढीवर येईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options