मत्तय १९:३-९
३
काही परूशी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी तिथे आले. त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने प्रत्येक किंवा कोणत्याही कारणासाठी त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?”
४
येशूंनी उलट विचारले, “तुम्ही वाचले नाही काय? प्रारंभी ‘परमेश्वराने पुरुष व स्त्री असे निर्माण केली,’
५
आणि, ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि दोघे एकदेह होतील.’
६
म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.”
७
“मग” त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे असे मोशेने का सांगितले?”
८
यावर येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने तुम्हाला आज्ञा दिली. परंतु मुळात परमेश्वराची तशी इच्छा नव्हती.
९
मी तुम्हाला सांगतो, व्यभिचाराच्या कारणाशिवाय जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”
Settings