Skip to content
मत्तय १३:३-९

पेरणाऱ्याचा दाखला

मत्तय १३:३-९

पेरणाऱ्याचा दाखला

अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकवीत ते म्हणाले: “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला.
तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले.
काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले.
परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली.
काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले; ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली.
परंतु काही बी सुपीक जमिनीत पडले आणि जेवढे पेरले होते त्या काही ठिकाणी शंभरपट, साठपट किंवा तीसपट पीक आले.
ज्याला ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • मार्क ४:२

    त्यांनी अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकविल्या, त्यांच्या शिक्षणात त्यांनी सांगितले:
    वचन ३ मधून
  • मार्क ४:९

    मग येशू म्हणाले, “ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.”
    वचन ३ मधून
  • लूक ८:१५

    काही बी उत्तम जमिनीत पडते, ते प्रामाणिक व चांगल्या अंतःकरणाच्या लोकांचे प्रतीक आहे, जे परमेश्वराचे वचन ऐकतात व धरून राहतात आणि धीराने पीक देतात.
    वचन ८ मधून
  • मत्तय १३:२३

    परंतु चांगल्या जमिनीत पडलेले बी असा व्यक्ती आहे की जो परमेश्वराचे वचन ऐकतो आणि समजतो आणि मग, जे पेरले होते त्यापेक्षा शंभरपट पीक, साठपट किंवा तीसपट पीक देतो.”
    वचन ८ मधून
  • उत्पत्ती २६:१२

    इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण याहवेहने इसहाकाला आशीर्वादित केले.
    वचन ८ मधून
  • योहान १५:८

    तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी आहे.
    वचन ८ मधून
  • मत्तय १३:१८

    “तर पेरणी करणार्‍याच्या दाखल्याचा अर्थ काय आहे ते ऐका:
    वचन ४ मधून
  • मत्तय १३:१९

    वाटेवर पडलेले बी अशा हृदयाच्या लोकांचे प्रतीक आहे की, ते परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता ऐकतात पण त्यातील त्यांना काहीही समजत नाही. मग सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो.
    वचन ४ मधून
  • मार्क ४:१८

    काही असे आहेत, की ते काटेरी झुडपांमध्ये पेरणी केलेल्या बियांप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात;
    वचन ७ मधून
  • मार्क ४:१९

    परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा व इतर गोष्टींची हाव यांची त्यांना भुरळ पडते आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ येत नाही.
    वचन ७ मधून
  • मार्क ४:१३

    नंतर येशू त्यांना म्हणाले, “तुम्हाला हा दाखला समजत नाही का? तर इतर दाखले तुम्हाला कसे समजतील?
    वचन ३ मधून
  • मत्तय १३:२१

    परंतु वचनामुळे संकटे आली किंवा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. त्यांना मूळ नसल्यामुळे, ते लवकर नाहीसे होतात.
    वचन ६ मधून
All Matthew Sites (Jerusalem)
All Matthew Sites (Jerusalem) View full PDF
Matthew 13:1-9, Mark 1:35-39, Mark 2:1-12, Mark 2:13-17, Mark 4:1-20, Mark 4:21-25, Mark 4:26-34, Luke 7:1-09
Matthew 13:1-9, Mark 1:35-39, Mark 2:1-12, Mark 2:13-17, Mark 4:1-20, Mark 4:21-25, Mark 4:26-34, Luke 7:1-09 View full PDF
All Matthew Sites (Levant)
All Matthew Sites (Levant) View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options