Skip to content
मार्क ६:७-१३

बारा जणांची पाठवणी

मार्क ६:७-१३
७
त्यांनी बारा प्रेषितांना आपल्याकडे बोलाविले आणि त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला.
८
त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्यासोबत अन्न, झोळी, कमरपट्ट्यात पैसे असे काहीही घेऊ नका.
९
जोडे घाला, पण अतिरिक्त अंगरखा घेऊ नका.
१०
ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, त्यावेळी त्या गावातून निघेपर्यंत तिथेच राहा.
११
एखाद्या ठिकाणी तुमचे स्वागत झाले नाही किंवा तुमचे ऐकले नाही, तर ते ठिकाण सोडून द्या व तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.”
१२
त्याप्रमाणे शिष्य बाहेर पडले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा असा त्यांनी संदेश दिला.
१३
त्यांनी पुष्कळ भुते काढली, अनेक आजार्‍यांना तैलाभ्यंग केले आणि त्यांना बरे केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options