Skip to content
लूक ७:१८-२३

लूक ७:१८-२३

१८
योहानालाही या सर्व गोष्टींविषयी त्याच्या शिष्यांनी सांगितले. त्याने दोघांना बोलाविले,
१९
आणि त्यांना प्रभूकडे विचारण्यास पाठविले: “जे यावयाचे ते आपण आहात किंवा आम्ही इतर कोणाची वाट पाहावी?”
२०
ते लोक येशूंकडे आल्यानंतर त्यांना म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहानाने आम्हास आपणाकडे असे विचारावयास पाठविले आहे की, जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्‍या कोणाची वाट पाहावी?”
२१
त्याच घटकेस, येशूंनी पुष्कळ लोकांस रोग, पीडा व दुरात्मे यापासून मुक्त केले होते आणि पुष्कळ आंधळ्यांना दृष्टी दिली.
२२
तेव्हा जे निरोप घेऊन आले होते त्यांना म्हणाले, “तुम्ही जे पाहिले आणि ऐकले ते योहानाला सांगा: आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.
२३
जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options