Skip to content
लूक ७:१-१०

लूक ७:१-१०

जे लोकांनी ऐकावे ते सांगून पूर्ण केल्यावर, येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला.
तिथे एका शताधिपतीचा सेवक, जो त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, तो आजारी असून मरावयास टेकला होता.
त्या शताधिपतीने येशूंविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलांना येशूंकडे पाठवून, त्यांना आपण येऊन सेवकाला बरे करावे अशी विनंती केली.
ते येशूंकडे आले आणि त्यांना आग्रहाने विनंती करून म्हणाले, “तुम्ही हे करावे यासाठी हा मनुष्य पात्र आहे,
कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रेम करतो, एवढेच नाही, तर त्याने आमच्यासाठी सभागृह ही बांधून दिले आहे.”
म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. पण घरापासून फार दूर नव्हते तेव्हा शताधिपतीने आपल्या मित्रांच्या हाती निरोप पाठविला: “प्रभू, माझ्या छप्पराखाली येण्याचा आपण त्रास घेऊ नका कारण त्यासाठी मी योग्य नाही.
आणि याकारणामुळेच तुमच्याकडे येण्यासाठी मी स्वतःला योग्य समजत नाही. परंतु तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल.
कारण मी स्वतः अधिकाऱ्याच्या अधीन असलेला मनुष्य असून, माझ्याही अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्‍याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे,’ कर अथवा, ‘ते,’ कर असे म्हटले तर तो ते करतो.”
येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते त्याच्या बोलण्यावरून आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागे आलेल्या लोकांच्या गर्दीकडे वळून ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलींमध्ये सुद्धा दिसून आला नाही.”
१०
त्या अधिकार्‍याचे मित्र त्याच्या घरी परतले, तेव्हा सेवक पूर्ण बरा झालेला त्यांना आढळला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options