Skip to content
लूक २०:४१-४७

लूक २०:४१-४७

४१
नंतर येशूंनी त्यांना एक प्रश्न विचारला, “ख्रिस्त हा दावीदाचा पुत्र आहे असे का म्हटले जाते?
४२
कारण दावीदाने स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हटले आहे: “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’
४४
दावीदच ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?”
४५
सभोवतालचा लोकसमुदाय हे ऐकत असतानाच ते आपल्या शिष्यांकडे वळून त्यांना म्हणाले,
४६
“या नियमशास्त्राच्या शिक्षकांपासून सावध राहा. त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे, सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे प्रिय आहे.
४७
ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options