Skip to content
शास्ते ५:२०-३१

शास्ते ५:२०-३१

२०
आकाशातून तारे लढले, त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले.
२१
किशोन नदीने त्यांना वाहून नेले, पुरातन नदी, किशोन नदी. कूच कर, माझ्या आत्म्या; समर्थ होऊन पुढे जा!
२२
घोड्यांच्या टापांचा गडगडाट झाला— घोडे चौखूर उधळले, त्याचे सशक्त घोडे चौखूर उधळले!
२३
याहवेहच्या दूताने आदेश दिला, ‘मेरोजला शाप द्या. त्याच्या लोकांना कडवटपणे शाप द्या, कारण ते याहवेहला मदत करावयाला आले नाहीत, पराक्रमी लोकांविरुद्ध याहवेहला मदत करावयाला आले नाहीत.’
२४
“स्त्रियांमध्ये सर्वाधिक आशीर्वादित याएल, केनी हेबेरची पत्नी, तंबूत राहणार्‍या स्त्रियांमध्ये सर्वात धन्य.
२५
त्याने पाणी मागितले आणि तिने त्याला दूध दिले; आणि सरदाराला साजेल अशा वाटीत त्याला दही दिले.
२६
तिचा हात तंबूच्या खुंटीकडे गेला, उजवा हात कामगाराच्या हातोडीसाठी. तिने सिसेराला मारले, तिने त्याचे डोके चिरडले. तिने त्याच्या कपाळाचे भोसकून तुकडे केले.
२७
तिच्या पायाशी तो खचला, तो पडला, जिथे तो पडला; तिथेच तो पडून राहिला. तिच्या पायाशी तो खचला, तो पडला; जिथे तो खचला, तिथे तो पडला व मेला.
२८
“खिडकीतून सिसेराच्या आईने डोकावले; जाळीच्या मागे ती ओरडली, ‘त्याचा रथ येण्यास इतका वेळ का लागला आहे? त्याच्या रथांचा कल्लोळ ऐकू येण्यास का उशीर होत आहे?’
२९
तिच्यातील हुशार स्त्रिया तिला उत्तर देतात; खरंच, ती स्वतःशीच म्हणते,
३०
‘ते लूट शोधून वाटून तर घेत नाहीत ना: प्रत्येक पुरुषासाठी एक किंवा दोन स्त्रिया, सिसेरासाठी लूट म्हणून रंगीबेरंगी वस्त्रे, रंगीबेरंगी नक्षीदार वस्त्रे, माझ्या गळ्यात भरतकाम केलेली वस्त्रे— ही सर्व लूट म्हणून आहेत काय?’
३१
“याहवेह याप्रकारे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होवो! जसा सूर्य आपल्या सामर्थ्याने उगवतो तसे, जे लोक तुमच्यावर प्रीती करतात ते सर्व त्या सूर्याप्रमाणे होवोत.” त्यानंतर देशात चाळीस वर्षे देशात शांतता होती.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options