शास्ते १०:१-५
१
अबीमेलेखाच्या काळानंतर इस्साखार गोत्राताल एक पुरुष, तोला जो पुआहचा पुत्र व दोदोचा नातू इस्राएलाच्या सुटकेसाठी उभा राहिला. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर नगरात राहत असे.
२
तेवीस वर्षे त्याने इस्राएलचे नेतृत्व केले; नंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली.
३
त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.
४
त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर म्हणून संबोधली जातात.
५
याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली.
Settings