Skip to content
यहोशुआ २४:१-८

यहोशुआ २४:१-८

१
नंतर यहोशुआने इस्राएलांच्या सर्व गोत्रांना शेखेम येथे एकत्र केले. त्याने इस्राएलचे वडीलजन, पुढारी, न्यायाधीश व सर्व अधिकाऱ्यांना बोलाविले आणि त्या सर्वांनी स्वतःस परमेश्वरासमोर सादर केले.
२
यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘फार पूर्वी तुमचे पूर्वज, अब्राहाम व नाहोराचा पिता तेरह, फरात नदीच्या पलीकडे राहत होते आणि ते इतर दैवतांची भक्ती करीत होते.
३
परंतु तुमचा पिता अब्राहामाला मी फरात नदीपलीकडील देशातून आणले व कनान देशात सर्वत्र फिरविले व त्याला अनेक वंशज दिले, मी त्याला इसहाक दिला,
४
आणि इसहाकाला याकोब आणि एसाव हे दिले. एसावाला मी सेईरचा डोंगराळ प्रदेश वतन करून दिला, परंतु याकोब आणि त्याचे कुटुंब इजिप्त देशास गेले.
५
“ ‘नंतर मी मोशे आणि अहरोनला पाठविले आणि मी तिथे जे केले त्यामुळे इजिप्तच्या लोकांवर पीडा आल्या आणि मी तुम्हाला बाहेर आणले.
६
जेव्हा मी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा तुम्ही समुद्राजवळ आला आणि इजिप्तच्या लोकांनी रथ आणि घोडेस्वार घेऊन तांबड्या समुद्रापर्यंत तुमचा पाठलाग केला.
७
त्यांनी साहाय्यासाठी याहवेहचा (म्हणजे माझा) धावा केला आणि मी तुमच्या व इजिप्तच्या लोकांमध्ये अंधार केला, समुद्र इजिप्तच्या लोकांवर आणला आणि त्यात त्यांना बुडवून टाकले. मी इजिप्तच्या लोकांचे काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यानंतर तुम्ही पुष्कळ काळ अरण्यात राहिला.
८
“ ‘यार्देनेच्या पूर्वेकडे राहणार्‍या अमोर्‍यांच्या देशात मी तुम्हाला आणले. ते तुमच्याविरुद्ध लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. तुमच्यापुढे त्यांचा नाश केला आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options