मुख्य मजकुरावर जा
यहोशुआ १३:१५-२३

रूबेनचा प्रदेश

यहोशुआ १३:१५-२३
१५
रऊबेन गोत्राला त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने त्यांना जी भूमी दिली ती ही:
१६
आर्णोन खोर्‍यांच्या सीमेवर असलेले अरोएर शहर व खोर्‍यांच्या मध्यभागी असलेल्या नगरापासून मेदबा पलीकडील पठार,
१७
हेशबोन व दिबोन, बामोथ-बआल, बेथ-बआल-मेओनसह पठारावरील त्याची सर्व इतर नगरे,
१८
याहसाह, केदेमोथ, मेफाथ,
१९
किर्याथाईम, सिबमाह, खोर्‍यातील टेकडीवरील जेरेथ-नगर.
२०
बेथ-पौर, पिसगाची उतरण व बेथ-यशिमोथ.
२१
पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्‍यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला.
२२
या लोकांची त्यांनी युद्धात कत्तल केली होते, त्याचबरोबर इस्राएली लोकांनी शकुन पाहणारा बौराचा पुत्र बलामाला देखील तलवारीने मारून टाकले होते.
२३
यार्देनच्या किनार्‍यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options