Skip to content
यहोशुआ ११:१५-२०

विजय व आज्ञाधारकपणाचा आढावा

यहोशुआ ११:१५-२०
१५
कारण याहवेहने आपला सेवक मोशेला अशीच आज्ञा दिली होती; आणि मोशेने ही आज्ञा यहोशुआला दिली व यहोशुआने जसे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे केले; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे त्याने काळजीपूर्वक पालन केले.
१६
अशा रीतीने यहोशुआने हे सर्व देश जिंकून घेतले, म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेव प्रांत, गोशेनचा सर्व प्रांत, पश्चिमी तळवट, अराबा आणि इस्राएलचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट,
१७
सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी लबानोनाच्या खोर्‍यात असलेल्या बआल-गादपर्यंतचा सर्व प्रदेश. त्यांच्या सर्व राजांना त्याने हस्तगत केले व त्यांना जिवे मारले.
१८
या सर्व राजांशी यहोशुआने दीर्घकाळ युद्ध केले.
१९
गिबोनातील हिव्वी लोकांशिवाय कोणत्याही शहराने इस्राएली लोकांशी शांतीचा करार केला नाही; इस्राएली लोकांनी बाकीच्या सर्वांना लढाईत जिंकून घेतले.
२०
कारण याहवेहनेच इस्राएली लोकांशी युद्ध करण्यासाठी या राजांचे हृदय कठोर केले होते, अशासाठी की याहवेहने त्यांना काहीही दयामाया न दाखविता त्यांचा समूळ नाश करावा असे मोशेला आज्ञापिले होते. याहवेहने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे काही दयामाया न दाखविता त्यांचा वध करण्यात आला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options