Skip to content
योहान ४:१७-१८

योहान ४:१७-१८

१७
परंतु ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” त्यावर येशू म्हणाले, “मला पती नाही हे जे तू म्हणतेस ते अगदी खरे आहे.
१८
कारण वस्तुस्थिती अशी आहे की तुला पाच पती होते आणि जो पुरुष सध्या तुझ्याबरोबर आहे, तो तुझा पती नाही. तू जे काही सांगितले, ते सर्व सत्य आहे.”

हे देखील पहा

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • यिर्मयाह ३:२०

    परंतु आपल्या पतीला सोडून जाणार्‍या विश्वासघातकी स्त्रीसारखे तू इस्राएलाच्या घराण्या माझा विश्वासघात केला,” असे याहवेह म्हणतात.
    वचन १८ मधून
  • 1 करिंथकरांस ७:१०

    आता जे विवाहित आहेत, त्यांच्यासाठी मी एक आज्ञा देतो (मी नाही, पण प्रभू देतात) पत्नीने पतीपासून विभक्त होऊ नये.
    वचन १८ मधून
  • 1 करिंथकरांस ७:११

    पण पत्नी विभक्त झाली असेल, तर तिने दुसरा विवाह करू नये किंवा आपल्या पतीशी समेट करावा. पतीनेही आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ नये.
    वचन १८ मधून
  • मार्क १०:१२

    आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्‍या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.”
    वचन १८ मधून
  • यहेज्केल १६:३२

    “ ‘हे व्यभिचारी पत्नी! आपल्या पतीपेक्षा तुला अनोळखी लोक आवडतात!
    वचन १८ मधून
  • उत्पत्ती २०:३

    पण एका रात्री परमेश्वर स्वप्नात अबीमेलेखकडे आले आणि त्याला म्हणाले, “आता तुझा अंत झाल्यासारखाच आहे, कारण जी स्त्री तू आणली आहेस, ती विवाहित आहे.”
    वचन १८ मधून
  • उत्पत्ती ३४:२

    तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा पुत्र शेखेम, याने तिला पाहिले, तेव्हा तो तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून त्याने तिला भ्रष्ट केले.
    वचन १८ मधून
  • उत्पत्ती ३४:७

    तेवढ्यात याकोबाचे पुत्रही रानातून घरी आले. शेखेमने इस्राएलात अशी भयानक गोष्ट करून याकोबाच्या कन्येला भ्रष्ट केल्याचे वृत ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आणि ते संतप्त झाले कारण ही अपमानजनक गोष्ट घडणे अत्यंत घृणास्पद होते.
    वचन १८ मधून
  • उत्पत्ती ३४:८

    हमोर त्यांना म्हणाला, “माझा मुलगा शेखेम याचे हृदय तुमच्या मुलीकडे आकर्षित झाले आहे, म्हणून तिला त्याची पत्नी म्हणून द्या.
    वचन १८ मधून
  • उत्पत्ती ३४:३१

    यावर त्यांनी प्रत्युत्तर केले, “त्याने आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे व्यवहार करावा काय?”
    वचन १८ मधून
  • गणना ५:२९

    “ ‘जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीशी विवाहित असतानाही स्वतःला भ्रष्ट करते तेव्हा हा मत्सराचा नियम असावा,
    वचन १८ मधून
  • रोमकरांस ७:३

    पती जिवंत असताना, तिने दुसर्‍या पुरुषाशी संबंध ठेवले तर तिला व्यभिचारिणी म्हणतात; पण पती मरण पावल्यावर ती त्या नियमापासून मुक्त होते; नंतर तिने दुसर्‍या पुरुषाशी विवाह केला, तर ती व्यभिचारिणी होत नाही.
    वचन १८ मधून

हे कोठे घडते

All John Sites (Jerusalem)
All John Sites (Jerusalem) View full PDF
Jesus' Journey through Samaria
Jesus' Journey through Samaria View full PDF
John 4:16-25
John 4:16-25 View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options