योहान २०:११-१६
११
परंतु मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली. ती रडत असताना, तिने ओणवून कबरेच्या आत डोकावून पाहिले.
१२
आणि तिला, जिथे येशूंचे शरीर ठेवले होते तिथे, एक उशाशी व दुसरा पायथ्याशी शुभ्र झगा परिधान केलेले दोन देवदूत दिसले.
१३
त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?” तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभूला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कुठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.”
१४
असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही.
१५
येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?” तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर तुम्ही कुठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.”
१६
येशू तिला म्हणाले, “मरीये.” त्यांच्याकडे वळून ती अरामी भाषेत म्हणाली “रब्बूनी!” म्हणजे “गुरुजी.”
Settings