योहान १७:१५-१८
१५
तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे.
१६
जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.”
१७
सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे.
१८
जसे तुम्ही मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले आहे.