योहान १६:८-१५
८
जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल.
९
पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत;
१०
नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही;
११
न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे.
१२
“मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही.
१३
परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल.
१४
कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.
१५
पित्याचे जे सर्व आहे ते माझे आहे. यासाठी मी म्हणालो की आत्मा जे माझ्याकडून स्वीकारेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings