योहान १४:१५-२१
१५
“जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा.
१६
आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील—
१७
सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील.
१८
मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन.
१९
आता थोड्याच वेळात, जग मला आणखी पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.
२०
त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये आहे व तुम्ही मजमध्ये आहात व मी तुम्हामध्ये आहे.
२१
ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझे पिताही प्रीती करतील आणि मी देखील त्याजवर प्रीती करेन व स्वतः त्यांना प्रकट होईन.”
Settings