इय्योब ४१:१-९
१
“लिव्याथानाला माशाचा गळ घालून तू पकडू शकशील काय किंवा त्याच्या जिभेला दोर बांधू शकशील काय?
२
त्याच्या नाकातून तू दोरखंड टाकू शकतो काय किंवा त्याच्या जाभाडामध्ये आकडा खुपसशील काय?
३
दयेसाठी तो तुझ्याकडे विनवणी करीत राहील काय? तो तुझ्याशी सौम्य शब्दांनी बोलेल काय?
४
जन्मभर तुझा गुलाम म्हणून तू त्याला ठेवावे म्हणून तो तुझ्याशी करार करेल का?
५
एखाद्या पाळीव पक्ष्यासारखा तू त्याला ठेवशील काय किंवा तुझ्या घरातील तरुण स्त्रियांसाठी साखळीला बांधून ठेवू शकशील?
६
विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय? व्यापारी लोक त्याची आपसात वाटणी करून घेतील काय?
७
त्याच्या गुप्त चामड्यात बरची रोवशील काय किंवा मत्स्यबाण त्याच्या डोक्यात खुपसता येईल काय?
८
जर तू आपला हात त्याच्यावर ठेवला, तर त्या संघर्षाचे तुला स्मरण होऊन तसे तू पुन्हा कधीही करणार नाही!
९
त्याच्यावर वर्चस्व करण्याची कोणतीही आशा खोटी आहे; तो केवळ नजरेसमोर असणेच अत्यंत तीव्रतेचे आहे.
Settings