इय्योब ४०:२०-२४
२०
डोंगर आपले उत्तम उत्पादन त्याला पुरवितात; आणि सर्व वनपशू त्याच्याभोवती खेळतात.
२१
कमलिनीखाली तो पडून राहतो, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत तो लपून असतो.
२२
कमलिनी आपल्या छायेत त्याला झाकतात; ओढ्याच्या सभोवतीची उंच वाळुंजे त्याला वेढून घेतात.
२३
उफळत्या नदीचे प्रवाह त्याला हानी करत नाही; यार्देनेचा ओघ त्याच्या तोंडावर वेगाने आला तरी तो सुरक्षित असतो.
२४
उघड्या डोळ्यांनी कोणी त्याला धरेल काय, किंवा त्याला जाळ्यात अडकवून त्याचे नाक टोचतील काय?
Settings