Skip to content
इय्योब ३१:१६-२३

गरीब व असहायांना उदारता

इय्योब ३१:१६-२३
१६
“जर मी गरिबांच्या हृदयाच्या इच्छा नाकारल्‍या असतील अथवा विधवांच्या डोळ्यात निराशा येण्याचे कारण झालो असेल,
१७
जर मी माझे अन्न स्‍वतःपाशीच ठेवले, आणि ते मी अनाथांना वाटून दिले नाही—
१८
परंतु माझ्या तारुण्याच्या दिवसांपासून पित्याने करावे तसे मी त्यांचे पोषण केले, आणि माझ्या जन्मापासून मी विधवांचे मार्गदर्शन केले.
१९
मी जर कोणाला वस्‍त्राविना, आणि गरजवंत लोक ज्यांना पुरेसे कपडे नाहीत अशांचा नाश होताना पाहिले,
२०
त्यांना ऊब यावी म्हणून माझ्या मेंढरांच्या लोकरीचे पांघरूण दिले तरीही त्यांच्या हृदयाने मला आशीर्वाद दिला नाही,
२१
न्यायालयात मी प्रभावी आहे हे जाणून, मी जर एखाद्या अनाथावर हात उगारला असेन,
२२
तर खांद्यापासून माझा हात गळून पडो, सांध्‍यापासून ते तुटून जावोत.
२३
कारण परमेश्वरापासून आलेल्या विपत्तीने मला भयभीत केले आहे, आणि त्यांच्या वैभवाच्या भयनिमित्ताने या सर्वगोष्टी मी केल्या नाहीत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options