इय्योब ३०:१-५
१
“परंतु आता जे माझ्याहून वयाने लहान आहेत, ते माझी चेष्टा करतात, ज्यांच्या वडिलांना मी तिरस्काराने मेंढ्यांचे राखण करणार्या कुत्र्यांबरोबर बसविले.
२
त्यांच्या हातच्या सामर्थ्याचा मला काय लाभ, जेव्हा त्यांचा जोम त्यांच्यात राहिलाच नाही?
३
भुकेने ते निस्तेज पडले आहेत, रात्रीच्या वेळी शुष्क आणि निर्जन भूमीवर ते वणवण भटकले.
४
ते औषधी वनस्पतीचा पाला गोळा करत होते, केरसुणीच्या झाडाची मुळे त्यांचे अन्न होते.
५
त्यांना समाजातून घालवून दिले होते, जसे चोरांवर ओरडावे तसे त्यांच्यामागून लोक ओरडत होते.
Settings