Skip to content
इय्योब २२:२१-३०

इय्योब २२:२१-३०

२१
“परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर; म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल.
२२
त्यांच्या मुखातून आलेल्या आज्ञा स्वीकारून घे त्यांचे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेव.
२३
जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्‍यातून दुष्टता काढून टाकशील: तर तू पुनर्स्थापित होशील.
२४
जर तू आपले सोने धुळीत मिळवशील, आणि तुझे ओफीराचे सोने नदीच्या गाळात टाकून देशील,
२५
तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने, आणि तुझे मौल्यवान रुपे होतील.
२६
मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्‍ये आनंद पावशील व आपली दृष्टी परमेश्वराकडे वर लावशील.
२७
तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, आणि तुझे नवस तू फेडशील.
२८
ज्याची तू इच्छा धरशील, ते घडून येईल, आणि तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल.
२९
जेव्हा लोकांना नीच केले जाते तेव्हा तू म्हणशील, ‘त्यांना उचलून धर!’ जे पडलेले ते वाचविले जातील.
३०
आणि जे निर्दोष नाहीत त्यांना देखील ते वाचवतील, आणि तुझ्या शुद्ध हातांकरवी ते पातक्यांना साहाय्य करतील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options