मुख्य मजकुरावर जा
इय्योब २२:१२-२०

देवाचे सर्वज्ञत्व व दुष्टांचा शेवट

इय्योब २२:१२-२०
१२
“परमेश्वर उच्चतम स्वर्गामध्ये नाहीत काय? आणि अतिउंच असलेल्या त्या तार्‍यांकडे बघ!
१३
पण तरीही तू म्हणतोस, ‘परमेश्वराला काय माहीत? निबिड अंधकारातून ते न्याय करतील काय?
१४
ते जेव्हा घुमटकार नभोमंडळात चालतात तेव्हा त्यांनी आम्हाला बघू नये म्हणून दाट ढगांनी त्यांच्यावर पडदा टाकला आहे.’
१५
पुरातन मार्ग जे दुष्टांनी पत्करले होते त्यावर अजून किती काळ तू चालशील?
१६
ते तर त्यांच्या नेमीत वेळेच्‍या आधी उठविले गेले, त्यांच्या जीवनाचा पाया पुराच्या जलात वाहून गेला.
१७
ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा! सर्वसमर्थ आमच्यासाठी काय करणार?’
१८
तरीही परमेश्वराने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली, म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर राहतो.
१९
नीतिमान दुष्टांचा नाश झालेला पाहून हर्ष करतील; निर्दोष लोक त्यांचा उपहास करतील,
२०
ते म्हणतील, ‘खचितच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे, अग्नीने त्यांची संपत्ती भस्म केली आहे.’
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options