मुख्य मजकुरावर जा
इय्योब २१:७-१६

दुष्टांची निर्विवाद समृद्धी

इय्योब २१:७-१६
दुर्जनांना दीर्घायुष्य का मिळते, वयाने परिपक्व होऊन ते सशक्त का होतात?
त्यांची मुले त्यांच्याभोवती स्थिर झालेली त्यांना दिसतात, आणि त्यांचे वंशज त्यांच्या दृष्टीपुढे असतात.
त्यांची घरे भयविरहीत व सुरक्षित असतात; परमेश्वराचा दंड त्यांच्यावर नसतो.
१०
त्यांचा बैल निष्फळ असत नाही; त्यांच्या गाई वासरांना जन्म देतात आणि त्यांचा गर्भपात होत नाही.
११
ते आपली मुले कळपासारखी बाहेर पाठवितात; आणि त्यांची लेकरे नाचत बागडतात.
१२
डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात; आणि बासरीच्‍या स्‍वरावर हर्षनाद करतात.
१३
ते आपला जीवनक्रम समृद्धीत घालवितात आणि शांतीने खाली कबरेत जातात.
१४
तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा! तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही.
१५
हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’
१६
परंतु त्यांची समृद्धी त्यांच्या स्वतःच्या हातात नाही, म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर थांबतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options