मुख्य मजकुरावर जा
इय्योब २१:१७-२२

दैवी न्यायाच्या वेळेबद्दल प्रश्न

इय्योब २१:१७-२२
१७
“तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो? आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते, परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?
१८
ते कितीदा वार्‍यापुढे वाळलेल्या पेंढ्यांप्रमाणे असतात, व वादळापुढे उडविलेल्या भुशासारखे उडून जातात?
१९
असे म्हटले जाते, ‘परमेश्वर दुर्जनांची शिक्षा त्याच्या संततीसाठी राखून ठेवतात.’ दुर्जनालाच स्वतःच्या पापाची परतफेड करू द्यावी, म्हणजे त्याला त्याचा अनुभव येईल!
२०
आपला नाश होत आहे हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे; सर्वसमर्थाच्या क्रोधाचा प्याला त्याने प्यावा.
२१
जेव्हा त्याला नेमून दिलेला काळ समाप्त होतो तेव्हा आपण आपल्यामागे सोडून दिलेल्या कुटुंबाविषयी त्याला काय चिंता?
२२
“परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल, कारण सर्वोच्च व्यक्तीचा न्याय सुद्धा तेच करतात?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options