Skip to content
इय्योब २०:४-११

दुष्टांचा विजय अल्पकाळ टिकतो

इय्योब २०:४-११
४
“पुरातन काळापासूनची वस्तुस्थिती आणि मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली, तेव्हापासूनच्या गोष्टी तुला खचित माहीत आहेत,
५
की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे, देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे.
६
जरी देवहीन मनुष्याचा गर्व आकाशापर्यंत पोहोचला आणि त्याचे डोके आभाळाला जाऊन भिडले,
७
तरी तो आपल्या स्वतःच्या विष्ठेप्रमाणे नष्ट होणार; जे त्याला ओळखीत होते, ते विचारीत राहतील, ‘तो कुठे आहे?’
८
तो स्वप्नासारखा विरून जाईल आणि पुन्हा सापडणार नाही. रात्रीच्या दृष्‍टांताप्रमाणे तो नाहीसा होईल.
९
ज्यांनी त्याला पाहिले होते, ते त्याला पुन्हा पाहणार नाहीत; त्याचे स्थान त्याच्याकडे पुन्हा पाहणार नाही.
१०
त्याची मुलेबाळे गरिबांची नुकसान भरपाई करतील; आणि स्वतःच्या हातांनी आपली संपत्ती परत करतील.
११
तारुण्याचा जो जोम त्याच्या हाडात भरलेला आहे तो त्याच्याबरोबरच धुळीत मिळेल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options