Skip to content
इय्योब १२:६-२२

इय्योब १२:६-२२

६
हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात, आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात— ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.
७
“परंतु प्राण्यांना विचार, ते तुला शिकवतील, किंवा आकाशातील पाखरे तुला सांगतील;
८
अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल; किंवा सागरातील माशांनी तुला माहिती देऊ दे.
९
या सर्वापैकी कोणासही ठाऊक नाही का की याहवेहच्या हाताने हे केले आहे?
१०
कारण प्रत्येक प्राण्याचा जीव, आणि सर्व मानवजातीचा श्वास त्यांच्याच हातात आहे.
११
जशी अन्नाची चव जिभेला समजते, तशीच शब्दांची पारख कान करीत नाहीत का?
१२
वयस्कांमध्ये ज्ञान आढळून येते की नाही? दीर्घ आयुष्याने समज येते की नाही?
१३
“ज्ञान आणि सामर्थ्य हे परमेश्वराचे आहेत; सल्ला आणि समज त्यांचेच आहे.
१४
ते जे पाडतात, ते पुन्हा बांधता येत नाही; ते ज्याला बंदिवासात पकडतात, त्याला सुटका नाही.
१५
परमेश्वराने जर पाऊस रोखून धरला, तर दुष्काळ पडतो; आणि त्याला मोकळे सोडले, तर पृथ्वी उद्ध्वस्त होते.
१६
पराक्रम आणि शहाणपण ही त्यांची आहेत; फसणारे आणि फसविणारे दोन्हीही त्यांचेच आहेत.
१७
ते मंत्र्यांना विवस्त्र करतात आणि न्यायाधीशांना मूर्ख ठरवितात.
१८
राजांनी टाकलेली बेडी ते तोडून टाकतात आणि त्यांच्या कंबरेस लंगोट बांधतात.
१९
ते याजकांना अनवाणी चालावयास लावतात स्थिर झालेल्या अधिकार्‍यांना ते उलथून टाकतात.
२०
विश्वासू सल्लागारांची तोंडे ते बंद करतात आणि वडीलजनांचा विवेक काढून घेतात.
२१
ते सरदारांवर तिरस्कार ओततात, आणि सबळांना दुर्बल करतात.
२२
ते अंधारातील गुप्त गोष्टी प्रकट करतात आणि घोर अंधकाराला प्रकाशाने उजळून टाकतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options