मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह ५१:५९-६४

बुडणाऱ्या गुंडाळीची प्रतीकात्मक भविष्यवाणी

यिर्मयाह ५१:५९-६४
५९
सिद्कीयाहच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी जेव्हा यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा राजा सिद्कीयाहसह बाबेलला गेला, तेव्हा त्याने सेरायाहस, जो नेरीयाहचा पुत्र, जो महसेयाहचा नातू, तो सैन्यात दुय्यम दर्जाचा एक अधिकारी होता त्याला हा संदेश दिला.
६०
बाबेलवर जी भयंकर अरिष्टे येणार होती, ती यिर्मयाहने एका गुंडाळीवर लिहिली—बाबेलवर येणाऱ्या सर्व अरिष्टांची नोंद करून ठेवण्यात आली होती.
६१
यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच.
६२
मग म्हण, ‘हे याहवेह, तुम्ही म्हटले की तुम्ही बाबेलचा नाश कराल व तिथे कोणीही मनुष्य वा पशूप्राणी वसती करणार नाही; ती कायमची ओसाड होईल.’
६३
मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात नदीत फेकून दे.
६४
आणि म्हण, ‘बाबेलही अशीच बुडेल व पुन्हा कधीही वर येणार नाही, कारण मी तिच्यावर अरिष्ट आणणार आहे, आणि तिच्यामधील लोक पडतील.’ ” इथे यिर्मयाहच्या संदेशाचा शेवट होतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options