Skip to content
यिर्मयाह ३८:१४-१९

यिर्मयाह ३८:१४-१९

१४
एके दिवशी सिद्कीयाह राजाने निरोप पाठविला की यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहच्या मंदिराच्या बाजूच्या देवडीत घेऊन यावे. राजा यिर्मयाहला म्हणाला, “मी तुला काही विचारणार आहे. तर खरे तेच सांग. मजपासून काहीही लपविण्याचा प्रयत्न करू नकोस.”
१५
त्यावर यिर्मयाह सिद्कीयाह राजा म्हणाला, “मी तुम्हाला उत्तर दिले, तर तुम्ही मला ठार करणार नाही का? आणि मी तुम्हाला काही सल्ला जरी दिला तरी तुम्ही माझे ऐकणार नाहीच.”
१६
तेव्हा सिद्कीयाह राजाने यिर्मयाहला त्याचे उत्पन्नकर्ता, सर्वसमर्थ याहवेह, यांची गुप्तपणे शपथ वाहिली: “मी तुला ठार मारणार नाही किंवा तुझा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हाती तुला देणार नाही.”
१७
मग यिर्मयाह सिद्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: तुम्ही बाबेलच्या राजाला शरण गेलात तर तुमचा जीव वाचेल आणि हे शहर जाळण्यात येणार नाही; तुम्ही व तुमचे घराणे जगेल.
१८
परंतु तुम्ही बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्यांना शरण जाण्याचे नाकारलेस, तर हे शहर बाबेल्यांच्या हाती देण्यात येईल आणि ते या शहराला आग लावील आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाहीस.”
१९
यावर राजा सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “मला पुढे बाबेलला गेलेल्या यहूद्यांची भीती वाटते, कारण बाबिलोनचे लोक मला यहूद्यांच्या हाती देतील व ते माझे हाल करतील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options