Skip to content
यिर्मयाह ३८:२४-२८

यिर्मयाह ३८:२४-२८

२४
मग सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “या चर्चेबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस, नाहीतर तुझा वध होईल.
२५
मी तुझ्याशी बोललो, हे माझ्या अधिकार्‍यांना कळले, व ‘आम्हाला सांग, राजाला तू काय सांगितले व राजाने तुला काय सांगितले; काहीही लपवू नकोस नाहीतर, आम्ही तुला ठार करतो,’ अशी त्यांनी तुला धमकी दिली,
२६
तर त्यांना एवढेच सांग, ‘योनाथानच्या घरच्या अंधारकोठडीत मला पुन्हा पाठवू नका, नाहीतर तिथे मी मरेन, एवढीच विनवणी मी राजाला केली.’ ”
२७
सर्व नगराधिकारी यिर्मयाहकडे आले व त्याला प्रश्न विचारू लागले. तेव्हा राजाने आज्ञापिल्याप्रमाणे यिर्मयाहने त्यांना सांगितले. मग त्यांनी त्याला काहीही विचारले नाही व राजाशी त्याचा झालेला संवाद कोणीही ऐकला नव्हता.
२८
आणि बाबिलोनच्या लोकांनी यरुशलेम पुन्हा जिंकून घेईपर्यंत, यिर्मयाह राजवाड्यातील अंगणात राहिला. यरुशलेमचा अशाप्रकारे पाडाव झाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options