मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह ३:१९-२५

लोकांची कबुली व प्रार्थना

यिर्मयाह ३:१९-२५
१९
“मी स्वतःला म्हटले, “ ‘तुम्हाला माझ्या मुलाबाळांप्रमाणे वागवितांना मला किती आनंद होईल आणि मी तुम्हाला सुखद भूमी देईन, कोणत्याही देशापेक्षा अधिक सुंदर वतन.’ मला वाटले तू मला ‘पिता’ म्हणून हाक मारशील आणि माझे अनुसरण करण्यापासून मागे फिरणार नाही.
२०
परंतु आपल्या पतीला सोडून जाणार्‍या विश्वासघातकी स्त्रीसारखे तू इस्राएलाच्या घराण्या माझा विश्वासघात केला,” असे याहवेह म्हणतात.
२१
उजाड पर्वतांवरून रडण्याचा आवाज ऐकू येत आहे, तो इस्राएलाच्या लोकांच्या विलाप करण्याचा व धावा करण्याचा आवाज, कारण ते मार्गभ्रष्ट झाले आहेत आणि त्यांच्या याहवेह परमेश्वराला विसरले आहेत.
२२
“विश्वासहीन लोकांनो परत या; मी तुमच्यामागे घसरणीस बरे करेन.” “होय, आम्ही तुमच्याकडे येऊ, कारण तुम्हीच आमचे परमेश्वर याहवेह आहात.
२३
निश्चितच डोंगरावरील गोंधळ व पर्वतावरील फसवणूक; निश्चितच आमचे परमेश्वर याहवेह हेच इस्राएलचे तारण आहेत.
२४
आमच्या तारुण्यापासून लाजिरवाण्या दैवतांनी आमच्या पूर्वजांच्या कष्टाची फळे— त्यांच्या जनावरांचे थवे व कळप, त्यांचे पुत्र आणि कन्या गिळंकृत केले आहेत.
२५
आम्ही लज्जास्पद अवस्थेत लोळू आमची विटंबना आम्हाला झाकून टाको. आम्ही आमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी; तारुण्यापासून आजपर्यंत आमच्या याहवेह परमेश्वराची आज्ञा आम्ही पाळली नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options