यिर्मयाह २८:११-१६
११
आणि तिथे जमलेल्या समुदायाला उद्देशून हनन्याह म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: याचप्रकारे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवलेले जोखड मी दोन वर्षात तोडून टाकेन.” हे ऐकताच यिर्मयाह संदेष्टा तिथून चालता झाला.
१२
संदेष्टा हनन्याहने यिर्मयाहच्या मानेवरील जू मोडल्यानंतर याहवेहचे वचन यिर्मयाहला आले:
१३
“जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल.
१४
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: या सर्व राष्ट्रांच्या मानेवर मी लोखंडी जोखड ठेवले आहे, त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची गुलामगिरी करण्यास लावेन, व ते करतील. मी वनपशूही त्याच्या ताब्यात देईन.’ ”
१५
मग यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, “हनन्याह, ऐक! याहवेहने तुला पाठविलेले नाही, परंतु तू तुझ्या खोट्या संदेशावर विश्वास ठेवण्यास या राष्ट्रास विवश केले.
१६
म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.