Skip to content
यिर्मयाह १३:१४-२७

यिर्मयाह १३:१४-२७

१४
ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ”
१५
ऐका व लक्ष द्या, उर्मट होऊ नका, कारण असे याहवेहने म्हटले आहे.
१६
तुमच्या याहवेह परमेश्वराला गौरव द्या तुमच्यावर त्यांनी निबिड अंधार पाडण्याच्या आधी, अंधारलेल्या डोंगरावर तुमची पावले अडखळण्याआधी, तुम्ही प्रकाशाची आशा कराल, पण ते त्यास गहन अंधकारात आणि निबिड काळोखात बदलतील.
१७
जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर मी एकांतात अश्रू ढाळेन तुमच्या गर्विष्ठपणामुळे; माझे डोळे घोर रुदन करतील, माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल.
१८
राजाला व राजमातेला सांगा, “तुमच्या राजासनावरून खाली उतरा, कारण तुमचे वैभवी मुकुट तुमच्या मस्तकांवरून पडतील.”
१९
यहूदीयाच्या दक्षिणेकडील नेगेवप्रांतातील नगरवेशी बंद होतील, आणि त्या उघडण्यास तिथे कोणीही नसेल. संपूर्ण यहूदीयाला बंदिवासात नेण्यात येईल पूर्णपणे नेण्यात येईल.
२०
नेत्र उंच करा व पाहा उत्तरेकडून कूच करीत चालून येणार्‍यांना पाहा. ज्या मेंढरांचा तुला अभिमान होता, विश्वासाने तुझ्या सुपूर्द केलेला तुझा कळप कुठे आहे?
२१
ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील? तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का?
२२
“हे सर्व माझ्यावर का ओढवले?” असा प्रश्न तू जर स्वतःला विचारलास— तर तुझ्या घोर पापांमुळे हे घडत आहे तुझी वस्त्रे फाडण्यात आली तुझ्या शरीरास दुष्टतेने वागविले आहे.
२३
कूशी मनुष्याला आपल्या त्वचेचा रंग बदलता येईल का चित्त्याला आपल्या शरीरावरील ठिपके बदलता येतील का? त्याचप्रमाणे तुला सत्कर्मे करता येत नाहीत दुष्कर्मे करण्याची तुला चटक लागली आहे.
२४
“वार्‍यांनी भूस उडून जावे तसे मी तुला उडवून लावेन जणू वाळवंटी वाऱ्याने उडणारी.
२५
हाच तुझा वाटा आहे, तुला माझ्याकडून मिळावयाचा वतनभाग हाच होय,” असे याहवेह जाहीर करतात, “कारण तू मला विसरला आहेस आणि खोट्या दैवतांवर विश्वास ठेवलास.
२६
म्हणून मी तुझी वस्त्रे वर ओढून तुझ्या चेहऱ्यावर टाकेन जेणेकरून तुझी लाज उघडी पडेल—
२७
तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! डोंगरावर आणि शेतात चाललेली तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options