Skip to content
याकोब ४:७-८

याकोब ४:७-८

समर्पण आणि पश्चात्तापाचे आवाहन

तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल;
तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.

हे देखील पहा

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • स्तोत्रसंहिता १४५:१८

    जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.
    वचन ८ मधून
  • 1 पेत्र ५:८

    सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.
    वचन ७ मधून
  • 1 पेत्र ५:९

    विश्वासामध्ये दृढ उभे राहून त्याचा विरोध करा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभरातील विश्वासणाऱ्या लोकांच्या कुटुंबांना अशाच प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत.
    वचन ७ मधून
  • इफिसकरांस ४:२७

    आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका.
    वचन ७ मधून
  • इब्री १०:२२

    म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ.
    वचन ८ मधून
  • इफिसकरांस ६:११

    परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल.
    वचन ७ मधून
  • इफिसकरांस ६:१२

    कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे.
    वचन ७ मधून
  • मलाखी ३:७

    तुमच्या पूर्वजांच्या काळापासून तुम्ही माझ्या विधिनियमापासून दूर जात आहात व त्यांचे पालन करीत नाही. माझ्याकडे पुन्हा या व मी तुमच्याकडे परत येईन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्याकडे परत कसे यावे?’
    वचन ८ मधून
  • जखऱ्याह १:३

    म्हणून लोकांना सांग: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुम्हाकडे परत येईन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
    वचन ८ मधून
  • यशायाह ५५:६

    याहवेहच्या प्राप्तीचा काळ आहे, तेव्हा पर्यंतच त्यांचा शोध घ्या. ते समीप आहेत, तेव्हा पर्यंतच त्यांचा धावा करा.
    वचन ८ मधून
  • यशायाह ५५:७

    दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे. त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील.
    वचन ८ मधून
  • 1 पेत्र ५:६

    परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील.
    वचन ७ मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options